24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeतंत्रज्ञानविंडोज १० बंद होणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा

विंडोज १० बंद होणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टने एक मोठी घोषणा केली आहे. २०२५ मध्ये विंडोज १० बंद करण्यात येणार असल्याची स्पष्टोक्ती कंपनीने दिली आहे़ कंपनीने अपडेटेड विंडोज लाइफ सायकल फेस शीटमध्ये सांगितले की १४ ऑक्टोबर २०२५ रोजी विंडोज १० होम, प्रो, प्रो फॉर वर्कस्टेशन आणि प्रो एज्यूकेशन बंद केले जाईल़ म्हणजेच अमेरिका स्थित टेक कंपनी या तारखेपासून कोणतंही अपडेट आणि सिक्योरिटी फीचर जारी करणार नाही.

ज्यावेळी मायक्रोसॉफ्टने विंडोज १० लाँच केले, त्यावेळी त्यांनी हे विंडोजचे शेवटचे वर्जन असल्याचे सांगितले होते़ परंतु कंपनीच्या लेटेस्ट टीजरने या महिन्याच्या अखेरपर्यंत विंडोज ११ लाँच करणार असल्याचे म्हटले आहे. कंपनीने आपल्या वेबसाईटवर एक नवा इव्हेंट लिस्ट केला आहे, जो २४ जून रोजी होणार आहे. इव्हेंटमध्ये कंपनी नेक्स्ट फॉर विंडोज येणा-या प्रत्येक गोष्टीला हायलाईट करेल. मायक्रोसॉफ्टने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. मायक्रोसॉफ्ट बिल्ड २०२१ इव्हेंटमध्ये कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांनी नेक्स्ट जनरेशन विंडोज अपडेट गेल्या दशकातील सर्वात स्पेशल असेल, असे सांगितले.

निर्मात्यांसाठी मोठी आर्थिक संधी
लवकरच आम्ही डेव्हलपर्स आणि निर्मात्यांसाठी अधिक मोठी आर्थिक संधी अनलॉक करण्यासाठी गेल्या दशकातल्या विंडोजच्या सर्वात महत्त्वपूर्ण अपडेटपैकी एक शेअर करणार असल्याचे नडेला यांनी सांगितले. विंडोजच्या नेक्स्ट जनरेशनबाबत उत्साही असल्याचेही ते म्हणाले.

आता ड्रोनच्या मदतीने औषधे घरपोच मिळणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या