24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeनाशिकमध्ये जंगली जांभळापासून वाईन च्या निर्मितीचा उद्योग सुरू

नाशिकमध्ये जंगली जांभळापासून वाईन च्या निर्मितीचा उद्योग सुरू

एकमत ऑनलाईन

वाईन पार्कला मिळणार नविन ओळख : भारतामध्ये मधुमेहाचे प्रमाण जास्त आहे यावर आयुर्वेदामध्ये जांभूळ हे गुणकारी सांगितले गेले 

जांभळा पासून तयार होणाऱ्या वाइनला देश-विदेशातून मागणी वाढणार : जंगलाचा मेव्याची चव ही वाईन रुपाने प्रथमच चाखायला मिळणार

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथे द्राक्षापासून वाईन निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे, आता या ठिकाणी जंगली जांभूळपासून वाईन निर्मीती सुरू झाल्याने आता या वाईन पार्कला नविन ओळख मिळणार आहे .

भारतामध्ये मधुमेहाचे प्रमाण जास्त आहे यावर आयुर्वेदामध्ये जांभूळ हे गुणकारी सांगितले गेले आहे जांभळापासून या मधुमेहावरील अनेक औषधी तयार होतात. नव्याने तयार होणाऱ्या या जांभूळ वाईनमध्ये अ‍ॅन्टी कॅन्सरस , अ‍ॅन्टी एजींग अ‍ॅन्टी डायबेटीक तत्व आहे , यात रेसवीरोटाल् आहे . यामुळे या वाईनचे नाव रेसवीरा ठेवले आहे.

सध्याच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाने सुध्दा रेसवीरोटाल असलेले खाद्य घटक असलेले अन्न पदार्थ चा समावेश रोजच्या आहारात करायला लावला आहे, रोगप्रतिकार घटक जास्त असलेल्या या वाईनमध्ये मोठ्या प्रमाणात रेसवीरोटाल असते . विशेष म्हणजे या वाईन साठी लागणारे जांभुळ हे जंगलातून आदिवासी कडून विकत घेतलेले असते कोणत्याही प्रकारच्या शहरी भागातील जांभूळ या वाईन साठी वापरले जात नाही त्यामुळे आता जंगलाचा मेव्याची चव ही वाईन रुपाने प्रथमच चाखायला मिळणार आहे . यामुळे आता जंगलातील आदिवासींच्या जांभळाला मागणी वाढून त्यांनाही नव्याने रोजगार मिळणार आहे .

सध्याच्या काळात आयुर्वेदिक औषधांचे व त्या संबंधित पेयाचे बाजारपेठ वाढलेली आहे देश-विदेशातून यांना मागणी असते सदरच्या जांभळा पासून तयार होणाऱ्या वाइनला देश-विदेशातून मागणी वाढणार आहे

Read More  ‘ईडी’च्या पाच अधिकाऱ्यांना करोनाची लागण

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या