Saturday, September 23, 2023

बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई : टॅमेटोचे भाव भिडले गगनाला

नवी दिल्ली : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना परवडणा-या वस्तु प्रचंड महाग झाल्या आहेत. ज्या शहरात लॉकडाऊन पुन्हा जाहिर झाले त्या ठिकाणी प्रशासन कोरोनामुक्ती कडे वाटचाल करत आहेत तर व्यापारी हे सर्वसामान्यांना लुटण्याचा मार्ग अवलंबत आहेत. अशा ठिकाणी बटाटे ५० रुपये कांदे आणि पाठोपाठ टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई अशा स्थितीतून सर्वसामान्य नागरिकांना जावे लागत आहे.

देशातील बहुतांश मोठ्या शहरांमध्ये टोमॅटोचे दर सध्या 60 ते 70 रुपये प्रति किलो या पातळीवर गेलेले आहेत. मात्र, वर्षातील या काळात उत्पादन कमी होत असते. त्यामुळे टोमॅटोचे दर वाढले आहेत. परिस्थिती लवकरच पूर्ववत होईल, असे सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी याबाबत म्हटले आहे.

ते म्हणाले की, या महिन्यात टोमॅटोचे कमी उत्पादन होते. त्याचबरोबर हे उत्पादन नाशवंत असल्यामुळे ते दीर्घकाळ टिकविता येत नाही. देशभरातून उपलब्ध होत असलेल्या माहितीनुसार सध्या विविध शहरांमध्ये टोमॅटोचे दर 70 रुपयांपर्यंत वाढले आहेत. ज्या राज्यात टोमॅटोचे उत्पादन होते त्या राज्यातही टोमॅटोचे दर वरच्या पातळीवर आहेत.

पासवान म्हणाले की, दरवर्षी जुलै ते सप्टेंबरदरम्यान टोमॅटोचे दर वाढत असतात. उत्तर प्रदेश, राजस्थान, झारखंड, पंजाब, तमिळनाडू, केरळ, जम्मू आणि काश्‍मीर, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये त्यांच्या गरजेपेक्षा टोमॅटोचे उत्पादन कमी होत असल्यामुळे ही राज्य इतर राज्यांवर अवलंबून असतात. भारतात वार्षिक पातळीवर 19.73 दशलक्ष टन टोमॅटोचे उत्पादन होते तर भारताला 11.51 दशलक्ष टन टोमॅटोची गरज आहे. उरलेले उत्पादन शेजारच्या निर्यात केले जाते.

Read More  औरंगाबादेत सकाळच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी 35 रुग्णांची भर

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या