27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्र‘निधी रोखणे योग्य नाही’

‘निधी रोखणे योग्य नाही’

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : राजर्षि शाहू महाराज यांच्या समाधीस्थळासाठी दिलेला निधी रोखण्यावरून सतेज पाटील म्हणाले की, ‘निधी रोखणे योग्य नाही’यासंदर्भात दोन्ही काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटले आहे. ही सार्वजनिक कामे आहेत, कुणाच्या घरची नाहीत, त्यावरील स्थगिती उठवा, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

विमानतळाच्या संदर्भात जो निधी आम्ही दिला आहे त्याबाबत जमीन ताब्यात घेण्यासाठी आज बैठक घेतली, अशी माहिती काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. तर निधी रोखण्यावरून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

विमानतळासंदर्भात आमच्या सरकारच्या काळात जवळपास २०० कोटींचा निधी मंजूर झाला होता. काही तडजोडीने या जमिनी ताब्यात घेण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले टाकली आहेत. लवकरात लवकर ६४ एकर जमीन ताब्यात मिळावी. आधी आठवड्याला बैठक घेत होतो. आता जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला हे काम लवकर करण्याचे सांगितले आहे, असे पाटील म्हणाले. तर राजकीय सत्तांतराचा गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्यावर कोणता परिणाम होईल असे वाटत नाही, असे ते म्हणाले. एका प्रवृत्तीच्या विरोधात स्वाभिमानी मतदारांनी ही निवडणूक लढवली आहे, असे वक्तव्यही त्यांनी केले.

एका बाजूला गोकुळमध्ये प्रवृत्ती होती, तिला हटवण्यासाठी गोकुळच्या स्वाभिमानी मतदारांनी या पॅनेलला निवडून दिले. त्यामुळे काहीही फरक पडणार नाही. सत्ता असो किंवा नसो, आम्ही कायम जनतेत असतो, असे ते म्हणाले. २०११ पासून जनगणना झाली नाही. त्यामुळे काही लॉजिक लावून हे मतदारसंघ वाढवले होते. सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर करत म्हटले आहे की, आम्ही निवडणुका घेऊ. सुप्रीम कोर्टानेदेखील त्याला अनुकूलता दर्शवली होती. असे असतानादेखील काहीतरी करायचे, निवडणुका पुढे ढकलायचा हा हेतू सरकारचा आहे, अशी टीका त्यांनी केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या