24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभारताशिवाय जगातील कोणतीही मोठी समस्या सुटने अशक्य

भारताशिवाय जगातील कोणतीही मोठी समस्या सुटने अशक्य

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगातील कोणतीही मोठी समस्या भारताशिवाय सुटू शकत नाही, त्यामुळे भारत हा महत्त्वाचा मित्र देश आहे, असे गौरोद्गार जर्मन फेडरल परराष्ट्र कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. टोबियास लिंडनर यांनी काढले आहेत. ते नवी दिल्ली येथे बोलत होते.

लिंडनर म्हणाले की, आम्हाला भारतासोबत तंत्रज्ञान, शिक्षण, सुरक्षा आणि हवामान बदलाबाबत सहकार्य करायचे असून भारताशिवाय कोणतीही मोठी समस्या सुटू शकत नसल्याचे ते म्हणाले. भारत हा एक महत्त्वाचा भागीदार असून भारत-जर्मनी संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक असल्याचेही डॉ. लिंडनर म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या बर्लिन दौ-यादरम्यान दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करू असेही लिंडनर यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या