32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeविना वॅक्सीन 'हे' औषध थांबवेल COVID-19 ला

विना वॅक्सीन ‘हे’ औषध थांबवेल COVID-19 ला

एकमत ऑनलाईन

‘कोरोना’बद्दल चीनच्या लॅबचा दावा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जागतिक साथीच्या कोरोना विषाणूमुळे जगभरात विनाश सुरूच आहे. मात्र, या धोकादायक विषाणूची अद्याप कोणतीही लस तयार झालेली नाही. जगभरातील शास्त्रज्ञ हा विषाणूवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. या दरम्यान, चिनी वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, त्यांनी असे औषध तयार केले आहे ज्यामुळे कोरोना विषाणूचा नाश होऊ शकेल. चीनमधील प्रयोगशाळेत याची तयारी केली जात आहे. त्यांचा असा विश्वास आहे की हे औषध कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखू शकते. चीनच्या प्रतिष्ठित पेकिंग विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी औषधाची चाचणी केली असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. हे औषध केवळ संक्रमित व्यक्ती बरे होण्याचा कालावधी कमी करत नाही तर कमी कालावधीसाठी विषाणूविरूद्ध प्रतिकारशक्ती देखील तयार करते.

Read More  अमेरिकेत पहिली मानवी चाचणी यशस्वी!

संक्रमित उंदरांवर यशस्वी चाचणी
विद्यापीठाच्या बीजिंग अ‍ॅडव्हान्स इनोव्हेशन सेंटर फॉर जिओनॉमिक्सचे संचालक सन्ने शी यांनी सांगितले की, प्राण्यांवर या औषधाची चाचणी यशस्वी झाली आहे. त्यांनी नमूद केले की, जेव्हा आम्ही या न्यूट्रीलायझिंग अँटीबॉडी संक्रमित उंदीरमध्ये इंजेक्ट केल्या, तेव्हा पाच दिवसानंतर व्हायरल लोड 2500 च्या घटकाने कमी केले गेले. त्यांनी सांगितले की, याचाच अर्थ या औषधाचा उपचारात्मक परिणाम झाला आहे. हे औषध न्यूट्रीलायझिंग अँटीबॉडी तयार करते, जे शी यांच्या टीमद्वारे कोरोनातून बरे झालेल्या 60 रूग्णांच्या रक्तातून घेण्यात आले होते. मानवी रोगप्रतिकारक क्षमतेद्वारे हे न्यूट्रीलायझिंग अँटीबॉडी तयार केले गेले आहेत, जेणेकरुन हा विषाणू पेशींना संक्रमित होण्यापासून रोखण्यासाठी मदत करेल.

शीच्या टीमने करण्यात आलेला हा अभ्यास रविवारी सायन्टिफिक जर्नल सेलमध्ये प्रकाशित केला. अँटीबॉडीजचा वापर हा विषाणूचा संभाव्य बरा होऊ शकतो आणि रोगापासून बरे होण्याचा कालावधीही कमी होऊ शकतो, असे सुचविले आहे. शी यांनी सांगितले की, अँटीबॉडीजच्या शोधात त्यांची टीम रात्रंदिवस काम करत आहेत.आमचे कौशल्य इम्यूनोलॉजी किंवा व्हायरोलॉजीऐवजी सिंगल सेल जीनोमिक्स आहे. जेव्हा आम्हाला कळले की, सिंगल सेल जीनोमिक दृष्टिकोनातून त्या अँटीबॉडी शोधता येतील, तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटले.

Read More  कोरोनाग्रस्त आढळल्यास आता इमारत सील केली जाणार नाही!

या वर्षापर्यंत तयार होईल औषध
शी पुढे म्हणाले की, यावर्षापर्यंत हे औषध तयार केले जाईल, जेणेकरुन 48 लाख लोकांना संक्रमित आणि 3,15,000 लोकांचा जीव घेतलेल्या या विषाणूपासून बचाव होऊ शकेल. ते म्हणाले की, क्लिनिकल ट्रायल्ससाठी काम चालू आहे. चीनमध्ये प्रकरणे कमी झाल्याने ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमध्ये याची चाचणी घेण्यात येणार आहे. आशा आहे की या न्यूट्रिलयझ अँटीबॉडी या विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी एक विशेष औषध म्हणून उदयास येतील, जेणेकरून साथीचा रोग थांबू शकेल. एका आरोग्य अधिकाऱ्याने गेल्या आठवड्यात सांगितले की, मानवी चाचणी टप्प्यासाठी कोरोना विषाणूची पाच संभाव्य लस चीनमध्ये आहे. दरम्यान , जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की या विषाणूची लस तयार करण्यास 12 ते 18 महिने लागू शकतात.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या