मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयासमोरच आव्हाड यांचा शिवगड हा बंगला आहे. या बंगल्यासमोर या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यासमोर या महिलेने स्वत:वर ज्वलनशील पदार्थ टाकला आणि पेटवून घेण्याचाही प्रयत्न केला. पण पोलिसांनी सतर्कता दाखवत तिला रोखले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. तृप्ती निवृत्ती कांबळे असे या महिलेचे नाव आहे. ही महिला बीडीडी चाळमधील रहिवासी असल्याची मााहितीसमोर आली आहे. या महिलेला मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिने हे कृत्य का केले याचा तपास पोलिस करत आहे.