पुणे : महाराष्ट्राच्या महिला कर्तंबगार आहेत. सावित्रीबाई, आनंदीबाई आणि प्रतिभाताई पाटील हे याचे मोठे उदाहरण आहे असे म्हणत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महिलांचे कौतुक केले. मी प्रतिभाताईंकडून अनेक गोष्टी शिकलो. आम्ही सोबत काम करतो. आतापर्यंत १३, १४ वेळा मला महाराष्ट्रात येण्याची संधी मिळाली. प्रतिभाताईंसोबत चर्चा झाली शेवट त्यांच्या बोलवण्यालरुन मी आज इथे आलो. त्यांनीही महाराष्ट्राची मान उंचावली आहे, असे म्हणत कोविंद यांनी प्रतिभाताई पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले.
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुणे दौ-यावर आहेत. दत्तमंत्र पठण करत रामनाथ कोविंद त्यांनी भाषणाला सुरुवात केली. जितकी खुर्ची उंच तितकी जबाबदारी जास्त असते. प्रतिभाताई पाटील यांच्या शिफारसीने मी इथे आलो. लक्ष्मीबाई दगडूशेठ ट्रस्टचे कार्य जवळून बघायला मिळाले. त्यांचे कार्य अफाट आहे, असं म्हणत त्यांनी दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राची भूमी सर्वगुणसंपुर्ण आहे. याच भूमीत संत तुकाराम, संत ज्ञानेश्वराचा जन्म झाला.
संत नामदेव यांच्यामुळे ही भूमी पावन झाली. याच भूमीवर दगडूशेठ गणपतीचे मंदिर असणे अत्यंत चांगली गोष्ट आहे. सुरुवातीच्या काळापासूनच महाराष्ट्र सगळ्याबाबतीत अग्रेसर होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची घोषणा केली. मराठ्यांचा असलेला प्रभाव कायम आपल्या देशाला एकजूट करण्यात महत्वाचा होता. अनेकता हिच एकता हे याच मराठ्यांनी भारतात अनेक वर्षांआधी बिंबविले. मागच्या वर्षी याच माहाराजांच्या पवित्र ठिकाणी म्हणजेच रायगडावर जाण्याचे सौभाग्य प्राप्त झाले असेही ते म्हणाले.