24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडापुढच्या वर्षी रंगणार महिला आयपीएल

पुढच्या वर्षी रंगणार महिला आयपीएल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महिला आयपीएल स्पर्धेला अंतिम स्वरूप देण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सुरुवात केली आहे. महिला आयपीएलचा पहिला हंगाम पुढील वर्षी मार्चमध्ये म्हणजेच २०२३ मध्ये खेळला जाणार असल्याची शक्यता दर्शवली जात आहे. यासाठी बीसीसीआयने आपले वेळापत्रकही बदलले आहे.

महिलांच्या लीगसाठी मार्च महिन्याला पसंती मिळत आहे. दरम्यान, ‘बीसीसीआय’च्या सप्टेंबर महिन्यात होणा-या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर शिक्कामोर्तब होईल. दक्षिण आफ्रिकेत ९ ते २६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान महिला टी- २० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा संपल्यावर लगेच महिलांची ‘आयपीएल’ खेळवली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महिला आयपीएलच्या पंधराव्या हंगामात पाच संघांमध्ये स्पर्धा पार पडणार आहे. मात्र, अनेक जणांनी महिला लीगमध्येही गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे ती सहा संघांचीसुद्धा होऊ शकते. महिला आयपीएल ऑक्शनची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती समोर येत आहे.

सौरव गांगुलीने काय म्हटले होते?
महिला आयपीएल स्पर्धा लवकरच सुरू होईल. भारतीय क्रिकेट बोर्डाने याचा ड्राफ्ट तयार करण्यास सुरुवात केली. येत्या तीन ते चार महिन्यांत या स्पर्धेबाबतची आमची योजना काय आहे, हे स्पष्ट होईल, असे गांगुली यांनी सांगितले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या