28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeक्रीडाइंग्लंडविरुध्दच्या सामन्यात महिला संघाचा विजय

इंग्लंडविरुध्दच्या सामन्यात महिला संघाचा विजय

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडच्या महिला संघाचा सात विकेट्सने पराभव केला. गोलंदाजांच्या भेदक मा-यानंतर फलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने विजय मिळवला.

इंग्लंड महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात २२७ धावांपर्यंत मजल मारली होती. भारतीय संघाने हे लक्ष तीन गड्यांच्या मोबदल्यात ४४.२ षटकात पार केले. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत आघाडी घेतली. इंग्लंड महिला संघानें दिलेल्या २२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शेफाली वर्मा अवघी एक धाव काढून तंबूत परतली. पण त्यानंतर स्मृती मंधानाने सर्व सूत्रे हातात घेतली. तिने झंझावाती ९१ धावांची खेळी केली. यासिका भाटिया (५०) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (७४) यांनी स्मृती मंधानाला चांगली साथ दिली. विजय दृष्टीक्षेपात आल्यानंतर स्मृती मंधाना बाद झाली. इंग्लंडकडून केट क्रॉस सर्वात यशस्वी ठरली. केट क्रॉसने दोन भारतीय फलंदाजांना बाद केले.

त्यापूर्वी हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या महिलांनी प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत २२७ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून डॅनिअल वॅट (४३), अ‍ॅलिस डेव्हिडसन रिचर्ड्स (नाबाद ५०) आणि सोफी एक्लेस्टोन (३१) यांच्या खेळीमुळे इंग्लंडच्या संघाने सन्माजनक धावसंख्या उभारली. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. त्याशिवाय झुलन गोस्वामीने अचूक टप्प्यावर मारा केला. झुलन गोस्वामीने १० षटकात फक्त २० धावा दिल्या. तिने दहा षटकात तब्बल ४२ चेंडू निर्धाव फेकले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या