24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रमराठवाडा पाणी ग्रीडच्या कामाची पैठणपासून सुरुवात

मराठवाडा पाणी ग्रीडच्या कामाची पैठणपासून सुरुवात

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२३ दुष्‍काळाचा सातत्‍याने फटका बसत असलेल्‍या मराठवाडा विभागातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी वॉटर ग्रीड हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता टप्प्या-टप्प्याने विकसित करण्यात येणार आहे. प्रथम औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यात येईल. या संदर्भातील प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास आणि त्यासाठी लागणाऱ्या २८५ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील इतर तालुके, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि उर्वरित पुढील टप्प्यांबाबत एकूण पाण्याची उपलब्धता व निधीच्या उपलब्धतेनुसार मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे पश्चिम वाहिनी नद्यांमधून पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याबाबत जलसंपदा विभागाने अभ्यास अहवाल (सुसाध्यता) सादर करण्यात येणार आहे.

पाऊस १३८ मि. मी. पेरणी २५ टक्केच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या