28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeआंतरराष्ट्रीयजगातील सर्वांत महागड्या औषधाला मंजुरी

जगातील सर्वांत महागड्या औषधाला मंजुरी

एकमत ऑनलाईन

एफडीएचा ग्रीन सिग्नल, एक डोस तब्बल २८.५१ कोटींचा, हिमोफिलिया-बीसाठी वापर
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या फेडरल ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (एफडीए) जगातील सर्वांत महागड्या औषधाला मान्यता दिली आहे. या औषधाच्या एक डोसची किंमत ३.५ मिलियन अमेरिकन डॉलर एवढी म्हणजेच २८.५१ कोटी रुपये आहे. हे औषध हिमोफिलिया बी या अत्यंत दुर्मिळ आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते. हा एक अनुवांशिक आजार आहे. त्यामध्ये मानवी रक्त कमी झाल्याचे दिसते. या आजारासाठी या औषधाचा डोस रामबाण उपाय असल्याचे सांगण्यात आले.

हिमोफिलिया-बी आजार अतिशय गंभीर आहे. परंतु तो दुर्मिळ आहे. त्याच्यावर उपचार करण्याच्या दृष्टीने औषध तयार करण्यात आले आहे. या आजारात पुरुषाच्या शरीरातील रक्त गोठण्याची प्रक्रिया होते. ज्या प्रकारे हे औषध या आजारावर उपचार करते, ते पाहता औषध विकसित करण्यासाठी घेतलेल्या कठोर परिश्रम आणि तंत्रज्ञानामुळे ही वाजवी किंमत आहे. हेमजेनिक्स असे या औषधाचे नाव आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

जेव्हा एखाद्याच्या शरीरात रक्त गोठण्याची प्रक्रिया किंवा गती कमी हाते, तेव्हा त्याच्या शरीरातून रक्तस्त्राव थांबत नाही. हा एक दुर्मिळ अनुवांशिक आजार आहे. या आजारावर मात करणे फार कठीण आहे. त्यामुळे हे औषध बनविले आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. पुरुषांना हिमोफिलिया-बी या आजाराने त्रास जास्त होतो. संपूर्ण जगात या आजाराचे नेमके किती रुग्ण आहेत, याचा अंदाज लावणे कठीण आहे. पण अमेरिकेत जवळपास ८ हजार पुरुष या आजाराशी झुंज देत आहेत. त्यांना यासाठी आयुष्यभर संघर्ष करावा लागणार आहे. या आजारावर उपचार करणे इतके महागडे आहे की, प्रत्येकालाच त्यावर योग्य उपचार करणे शक्य होत नाही. गंभीर आजारी लोकांमध्ये ही समस्या वाढते. त्यामुळे अशा औषधांची ब-याच दिवसांपासून गरज होती.

संशोधकांच्या अभ्यासानुसार हिमोफिलिया-बी ग्रस्त व्यक्ती संपूर्ण आयुष्यात १७१ ते १८७ कोटी रुपये खर्च करते किंवा संबंधित देशातील सरकारही इतका खर्च करते. अमेरिकेत यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. हेमजेनिक्स हे औषध एक इंजेक्शन आहे. औषध प्रत्यक्षात एक व्हायरस बेस्ड वेक्टर आहे. जे यकृताच्या लक्ष्य पेशींना इंजिनियर्ड डीएनए पाठवते. त्यानंतर औषधाद्वारे पाठविलेल्या जेनेटिक सूचनेला पेशी रेप्लीकेट करते. मग ही सूचना जाऊन क्लॉटिंग प्रोटिनला तुमचे काम योग्य करा, असा संदेश देते. याला फॅक्टर आयएक्स म्हणतात.

युरोपमध्ये उपचार स्वस्त
युरोपीयन देशांत या आजारावरील उपचार अमेरिकेपेक्षा स्वस्त आहे. मात्र, त्यानंतरही कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. दुसरीकडे हेमजेनिक्स हे असे औषध आहे, ज्याच्या एकाच डोसमुळे रुग्ण बरा होण्यास मदत होते. हे पूर्ण खर्र्चा पेक्षा स्वस्त असणार आहे.

दोनवेळा केला अभ्यास
हेमजेनिक्स या औषधाबाबत दोनवेळा अभ्यास करण्यात आला. जे हिमोफिलिया-बीचे रुग्ण मध्यम व गंभीर स्तरावर होते, अशा ५४ रुग्णांवर चाचण्या घेण्यात आल्या. हेमजेनिक्स घेतल्यानंतर सर्व रुग्णांमध्ये अनियंत्रित रक्तस्त्राव अर्ध्याहून अधिक कमी झाला. त्याचे दुष्परिणामही होतात. त्यात डोकेदुखी, सर्दीसारखी लक्षणे, यकृतात एन्झाईम्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार आवश्यक आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या