नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. ७ महिला कुस्तीपटूंनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यानंतर दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी पत्रकार परिषद घेऊन ब्रिजभूषण शरण यांच्या अटकेची मागणी केली.
ते म्हणाले, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो, पण संप सुरूच राहील अशी घोषणा केली . दिल्ली पोलिसांवर आपला विश्वास नाही, असे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले.
या प्रकरणाच्या दुसऱ्या सुनावणीदरम्यान महिला खेळाडूंच्या प्रकरणी दिल्ली पोलीस एफआयआर नोंदवणार असल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
तसेच ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी महिला कुस्तीपटूंना सुरक्षा देण्याच्या सूचना देण्यात याव्यात आणि निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपस करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.