25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे गटाच्या नेत्यांना वाय प्लस सुरक्षा

शिंदे गटाच्या नेत्यांना वाय प्लस सुरक्षा

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिंदे सरकारने दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षेत कपात केली तर काहींची सुरक्षा काढून घेतली. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच सरकारने शिंदे गटाला सुरक्षाकवच दिले आहे. शिंदे गटाचे दहा खासदार आणि ४१ आमदारांना राज्य सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे त्यामुळे आता यावरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.

मिळालेल्याा माहितीनुसार राज्यांत सत्ता बदल झाल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांवर आणि त्यांच्या शाखा आणि घरावर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर सर्व आमदारांना सीआरपी जवानांची सुरक्षा पुरवण्यात आली होती. आता माञ ही सुरक्षा कमी करण्यात आल्यामुळे या आमदारांना ही सुरक्षा पुरवण्यात आली आहे

. याबाबत गृह खात्याची रिव् ू मीटिंग पार पडली त्यामध्ये या आमदारांच्या सुरक्षेबाबत चर्चा झाली. अजूनही राज्यांतील परिस्थिती पाहता या आमदारांना सुरक्षा पुरवणे गरजेचं आहे हे लक्षात आल्यानंतरच या आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांची आणि मंत्र्यांची सुरक्षा काल अचानक नव्या सरकारने रद्द केली आणि त्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे नव्या सरकारने नार्वेकर, आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना अभय दिला आहे. त्यात ही मिलींद नार्वेकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या