28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रआज महाराष्ट्रात पावसाचा ‘यलो अलर्ट’ ; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

आज महाराष्ट्रात पावसाचा ‘यलो अलर्ट’ ; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. तसेच पुणे, नाशिक, अहमदनगर या भागातही पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, आजही हवामान विभागाने राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. आजही संपूर्ण राज्यात हवामान विभागातर्फे पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि परिसरात रात्री जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. वाहतूक संथ गतीने सुरू होती. पनवेलमधील वडघर कोळीवाडा येथील विसर्जन घाटावर गणेशभक्तांच्या सोयीसाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जनावेळी जोराचा पाऊस सुरू होता. यावेळी जनरेटरचे एक वायर तुटून एका तरुणाच्या अंगावर पडले. यावेळी त्याला शॉक लागला. त्याला पाहून कुटुंबियांनी मदत करण्यासाठी त्याला स्पर्श केला. या वेळी कुटुंबियांनाही विजेचा धक्का बसल्याची घटना घडली आहे.

यलो अलर्ट म्हणजे नेमके काय?
यलो अलर्ट म्हणजे नेमके काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्याने हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्­हाला तत्­काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्­ही ठिकाण आणि तुमच्­या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असा या अलर्टचा अर्थ आहे.

नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस
नाशिक शहरासह परिसरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. सायंकाळी पावणेसहा वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस रात्री पावणे बारा वाजेपर्यंत कोसळत होता. जवळपास पावणेसहा ते रात्री साडेअकरापर्यंत ८६.९ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी होते, तर उड्डाणपुलावरूनही पाणी वाहत होते. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पावसाने हजेरी लावल्याचे चित्र होते. दरम्यान, हवामान खात्याकडून नाशिकला शनिवारपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे.

जायकवाडी धरणातून ५६ हजार क्युसेकने विसर्ग
नाशिक जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पैठण येथील जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात सुद्धा पाण्याची आवक वाढली आहे. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवून एकूण ५६ हजार ५९२ क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग पाहता गणेशभक्तांनी नदी पात्रात विसर्जनासाठी जाऊ नयेत असे आवाहन प्रशासनाने केले होते. तर नदीकाठच्या गावांत पोलिसांकडून गस्तसुद्धा घातली जात आहे. गावातील पोलिस पाटलांनासुद्धा नदीकाठावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत जाहीर
एकीकडे राज्यात सर्वत्र गणपती बाप्पाचे विसर्जन होत असतानाच, दुसरीकडे राज्यातील शेतक-यांनाही बाप्पा पावला आहे. कारण शिंदे सरकारने राज्यातील सुमारे १९ लाख शेतक-यांना ३ हजार ५०१ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. पुढील दोन दिवसांत नुकसानभरपाईचे वाटप केले जाणार असल्याची माहिती, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या