22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात पावसाचा यलो अलर्ट; मुख्यमंत्री शिंदेंच्या सतर्क राहण्याच्या सूचना

राज्यात पावसाचा यलो अलर्ट; मुख्यमंत्री शिंदेंच्या सतर्क राहण्याच्या सूचना

एकमत ऑनलाईन

मुंबई : गणेशोत्सवापूर्वी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र गणेश चतुर्थीनंतर पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. आता गणेश विसर्जनाच्या काळातही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई ठाण्याासह कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार वा-यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यभरात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे चार पाच दिवस राज्यभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यताही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत.

पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिक-यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली आहे. या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना देतानाच मुख्य सचिवांनी जिल्हाधिका-यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यानी दिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या