23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; - वादळी वा-यासह पावसाची शक्यता

राज्यातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; – वादळी वा-यासह पावसाची शक्यता

एकमत ऑनलाईन

मुंबई : यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या काही तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. ‘असनी’ चक्रीवादळ निवळले असून त्यामुळे मान्सूनला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मान्सूनच्या या पार्श्वभूमीवर केरळसह दक्षिण भारतातील काही राज्यांना पावसाने झोडपून काढले आहे.
महाराष्ट्रातीलही नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी वा-यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मोसमी पावसाची प्रगती वेगाने होत असल्याने पुढील काही तासांमध्ये हा पाऊस अंदमान आणि निकोबार बेटांवर धडक देण्याची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

दरम्याम, महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावेल, असाही हवामान खात्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून केरळसह मेघालय, आसाम आणि पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या