37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीयहोय, चीनने केली घुसखोरी

होय, चीनने केली घुसखोरी

३८ हजार चौरस कि.मी. जमिनीवर ताबा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पूर्व लडाख सीमेवर चीनबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत महत्त्वाची माहिती दिली. लडाखमधील भारताची ३८ हजार क्वेअर किलोमीटर जमीन अनधिकृतपणे चीनने बळकावली आहे. त्याशिवाय १९६३ साली तथाकथित सीमा करारांतर्गत पाकिस्तानने पीओकेमधील ५,१८० स्क्वेअर किलोमीटरचा भूभाग बेकायदेशीररित्या चीनकडे सोपवला, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी आज संसदेत दिली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात लोकसभेत लडाखच्या मुद्यावरून भारत-चीन सीमावादावर अधिकृतपणे भारताची भूमिका मांडली. सीमा प्रश्न एक जटिल मुद्दा आहे, हे भारत आणि चीन दोघांनी औपचारिकरित्या मान्य केले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी संयमाची आवश्यकता आहे. तसेच शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातूनच या मुद्याचे निष्पक्ष, परस्पर सहमतीने समाधान निघू शकते, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. एलएसीजवळ दोन्ही देश सैन्याची तैनाती कमी ठेवतील, असा १९९३ आणि १९९६ मध्ये झालेल्या करारात उल्लेख आहे. सीमा प्रश्नी जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत एलएसीचा आदर ठेवायचा, उल्लंघन करायचे नाही, असेसुद्धा करारात म्हटले आहे. मात्र, चीनने या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोपही राजनाथ सिंह यांनी केला.

पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न
दोन्ही देशांनी जैसे थे स्थिती कायम ठेवली पाहिजे. चीनलाही हे मान्य आहे. मात्र, तरीही २९-३० ऑगस्टच्या रात्री चीनने पुन्हा पँगॉंगमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला. पण भारतीय सैनिकांनी त्यांचा हा डाव उधळून लावला. आपले सैनिक मातृभूमीच्या रक्षणासाठी तैनात आहेत, असा विश्वास सभागृहाला देतो, असे राजनाथसिंग म्हणाले. सीमा भागातील वाद सोडविण्यास भारत कटिबद्ध असून, संपूर्ण देश सैनिकांच्या पाठीशी आहे, असा ठराव करू या, असेही ते म्हणाले.

मोदींनी देशाची दिशाभूल केली
चीनने लडाखमधील भारतीय जमिनीवर कब्जा केल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कबूल केले. या माहितीचा हवाला देत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला असून, चीनच्या मुद्यावरून पंतप्रधानांनी देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला. आपला देश नेहमी लष्करासोबत उभा होता आणि राहिल. पण मोदीजी आपण केव्हा चीनविरोधात उभे राहणार आहात? चीनकडून आपल्या देशाची जमीन कधी परत घेणार? चीनचे नाव घ्यायला घाबरू नका, असा उपरोधिक टोलाही राहुल गांधी यांनी मोदींना लगावला. या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली नसल्याचे म्हटले होते.

कांदा निर्यातीबाबत भारताची प्रतिमा बिघडेल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या