27.3 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeक्रीडाहोय...हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करतोय

होय…हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करतोय

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करत आहे होय, हार्दिक पांड्या नताशा स्टॅनकोविकसोबत पुन्हा एकदा लग्न करणार आहे. त्याने डेस्टिनेशन वेडिंगसाठी उदयपुरची निवड केली आहे. हार्दिक आणि नताशा व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी पुन्हा एकदा लग्न करणार आहेत.

आतापर्यंत हार्दिकच्या लग्नाच्या ठिकाणाबद्दल सविस्तर माहिती मिळालेली नाही, कारण हे लग्न अतिशय सिक्रेटपद्धतीने केले जात आहे. हार्दिक-नताशाच्या लग्नात बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. २०२० च्या सुरुवातीला हार्दिक पांड्याने नताशासोबत गुपचुप लग्न केले होते. त्यांना एक मुलगाही आहे.

पूर्वी केले कोर्ट मॅरेज
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या आणि बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक यांनी मुंबईत कोर्ट मॅरेज केले होते. ३१ मे २०२० रोजी हार्दिक आणि नताशा यांनी कोर्टात लग्न केले होते. सध्या त्यांना एक मुलगा आहे. कोरोना काळात लग्नाला कुटुंबातील मोजकेच लोक उपस्थित होते. आता पुन्हा एकदा नताशा आणि हार्दिक लग्नाच्या बंधनात अडकत आहेत. हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार असल्याचं समोर आले आहे. लग्नासाठी हार्दिक-नताशा यांनी उदयपुरची निवड केली आहे. १३ फेब्रुवारीपासून लग्न सोहळ्याला सुरुवात होणार आहे. १४ फेब्रुवारी रोजी हार्दिक आणि नताशा पुन्हा लग्नबंधनात अडकणार आहेत. क्रुणाल पांड्याने हार्दिक आणि नताशाच्या लग्नासाठी खास प्लॅनिंग केल्याचं समजतेय.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या