26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रहोय, फडणवीसांनीच आम्हाला संरक्षण दिले : दीपक केसरकर

होय, फडणवीसांनीच आम्हाला संरक्षण दिले : दीपक केसरकर

एकमत ऑनलाईन

मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध चांगले असून आम्ही एकटे पडलो असताना फडणवीसांनीच आपल्याला संरक्षण दिलं असल्याची कबुली दीपक केसरकरांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात जेवढ्या लवकरात लवकर येण्यासाठी प्रयत्न केला जाईल. फ्लोअर टेस्ट घ्या, त्यावेळी आमची भूमिका मांडू. आज जे काही महाराष्ट्रात सुरू आहे ते इमोशनली ब्लॅकमेलचा प्रकार आहे असंही ते म्हणाले.

बंडखोर आमदारांच्या वतीनं बाजू मांडताना दीपक केसरकर म्हणाले की, माझे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत. रात्री १२ वाजताही फडणवीस माझा फोन उचलतात. आज जर आम्ही एकटे पडलो तर त्यांच्याकडे मदत मागितली तर त्यात काय बिघडलं. फडणवीसांनी स्वत: हून आम्हाला संरक्षण दिलं. भाजप शासित राज्यात आम्हाला संरक्षण मिळत आहे.

शरद पवारानी तीनवेळा शिवसेना फोडली
दीपक केसरकर म्हणाले की, राऊतांच्या वक्तव्यामुळे मोदी आणि ठाकरे यांचे संबंध बिघडत आहे. शरद पवारांनी तीन तीन वेळा शिवसेना फोडली. शिवसेनेचा आमदार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या राष्ट्रवादीच्या पडलेल्या उमेदवाराला ताकत दिली जातेय. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना त्यांच्यावर विश्वास होता, पण ते आता शिवसेना संपवत आहेत. सत्ता जाऊ नये म्हणून राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पणाला लावण्यात येत आहे. आम्ही भाजपमध्ये विलिन होणार असं म्हटलं जातंय, पण या अफवा आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या