23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्र’ होय ..रश्मी वहिनींचा फोन आला होता’; बंडखोर आ. दळवींच्या पत्नीचा...

’ होय ..रश्मी वहिनींचा फोन आला होता’; बंडखोर आ. दळवींच्या पत्नीचा खुलासा

एकमत ऑनलाईन

मुंबई : होय रश्मी वहिनींचा मला फोन आला होता. तुम्ही बंड का केलं? असे रश्मी ठाकरे म्हणाल्या असल्याचा खुलासा बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी केला आहे. सध्या राजकीय परिस्थिती अतिशय अस्थिर आहे. शिंदे गटात सामील होऊन गुवाहाटीला गेलेले शिवसेनेचे आमदार परत येत नाहीत तोवर महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात आहे.

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मैदानात उतरत बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन करत आपण राजकीय पक्ष म्हणून नाही तर आजवर परिवार म्हणून एकत्र होतो, इथून पुढेही राहू, असे आवाहन केले. त्याला आता आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी दुजोरा दिला आहे.

मानसी दळवी काय म्हणाल्या?
होय रश्मी वहिनींचा मला फोन आला होता. तुम्ही बंड का केलं? असे रश्मी ठाकरे म्हणाल्या. पण त्यांना उत्तर देताना मी म्हणाले की, तुमच्या म्हणण्यानुसार ही बंडखोरी आहे. पण एका आमदाराची पत्नी म्हणून मी सांगेन की, त्यांनी जो निर्णय घेतला आहे, तो योग्य आहे. त्याचं मी आणि आमचं कुटुंब समर्थन करतो, असे रश्मी ठाकरेंना सांगितल्याचे मानसी दळवी यांनी सांगितले.

याशिवाय तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात का?, असा प्रश्न रश्मी वहिनींनी विचारला. त्यावर मी म्हणाले की, आम्ही कालही कट्टर शिवसैनिक होतो. आजही आहोत आणि भविष्यातही शिवसैनिकच राहणार असं मी त्यांना सांगितले.

‘मातोश्री’वर आमचं म्हणणं ऐकण्यात आलं नाही. पण त्याचवेळी एकनाथ शिंदे आमच्यासाठी देवदूतासारखे धावून आले. आम्हाला आमदार निधी मिळवून दिला. त्यामुळे लोकांची कामं करता आली. त्यामुळेच आज आम्ही शिंदेसाहेबांच्या पाठिशी आहोत, असे रश्मी वहिनींना मी सांगितले, असे मानसी दळवी म्हणाल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या