Sunday, September 24, 2023

काल देशभरात ५२,१२३ रुग्णांची वाढ,आतापर्यंतची सर्वोच्च रुग्णसंख्या

नवी दिल्ली : देशात दररोज सरासरी 40 ते 50 हजारांदरम्यान नवे रूग्ण वाढत आहेत. मात्र आता हीच सरासरी वाढलेली दिसून येत आहे. तर मृत्यूंचं प्रमाण देखील वाढलं आहे. काल दिवसभरात 52,123 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे.

भारतातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या आतापर्यंत 15,83,792 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासांत दुर्दैवाने 775 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती केंद्रिय आरोग्य विभागाने दिली आहे.

देशभरात सध्या 5,28,242 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 10,20,582 रूग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. म्हणजेच एकूण अ‌ॅक्टीव्ह केसेसपैकी डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट सुधारून आता तो 63 टक्क्यांच्या वरती गेला आहे.

दुसरीकडे देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा कहर आहे. राज्यात कालच्या दिवसभरात कोरोनाच्या 9,211 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 1,46,129 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

देशभरात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत असली तर आनंददायक गोष्ट म्हणे 10 लाखाच्या वर रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Read More  कोविड-१९ प्रादुर्भाव काळात डॉक्टरांवर हल्ला होणे हे गंभीर बाब

 

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या