Tuesday, September 26, 2023

माझ्या बाळाला तुम्ही बरं केलंत, तुमचे उपकार

माय-लेकींची कोरोनावर यशस्वी मात; घरी परतताना मातेचा दाटून आला ऊर

कळंब : साहेब माझ्या बाळाला तुम्ही चांगल केले आहे. मी तुम्हाला कधीच विसरणार नाही, तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. असे म्हणत आपल्या सात वर्षाच्या चिमुकल्या मुलीसह घरी जाताना एका मातेला उर दाटून आला. तेंव्हा उपस्थिती डॉक्टर आणि नर्सच्याही डोळ्यात पाणी डबडबले होते.

मुंबईहुन वाशी तालुक्यातील qपपळगाव (qलगी) येथे आलेल्या माय लेकींसह आजोबांना कोरोणाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात २१ मे रोजी दाखल करण्यात आले होते. या माय लेकिना शनिवारी सायंकाळी नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार कुठलेही लक्षणे नसल्याने सुट्टी देण्यात आली. यावेळी घरी परतत असताना या मातेचा उर दाटून आला व या मातेने या आरोग्यसेवकां प्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील वातावरण खूपच भावुक बनले होते. तर घरी जाऊन कॉरणटाईन राहणार असल्याचे या चिमुकलीने सांगितल आहे.

जेंव्हा आई मुलगी व आजोबांना या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, तेंव्हा तिला इथले वातावरण जरा वेगळे वाटते होते. तिला जास्त उदास वाटू नये म्हणून डॉक्टरानी तिला टीव्ही चालू करून दिला होता पुढे तिच्या आवडीची खेळणी आणि मोबाईल मधील गेम खेळून ती वेळ घालवत होती. बोलायला चुणचुणीत असणारी ही चिमुकली सगळ्या सोबत गप्पा गोष्टी करत असल्याने सगळ्यांची ती लाडकी बनली होती. तर डॉक्टर आले कि मला कधी घरी सोडणार आहेत आजीची खूप आठवण येत आहे अशी हि चिमुकली म्हणायची.

ज्यावेळी या माय लेकिनां रुग्णालयात घरी सोडण्यात आले तेंव्हा गाडीत बसल्यावर त्यांना काहीतरी राहवल्यासारखे वाटले आणि त्या गाडीतून खाली उतरल्या. त्यावेळी आई चिमुकली न हातात पाचशे ची नोट घेऊन डॉक्टर आणि नर्सच्या दिशेने पुढे केली तेंव्हा सगळ्या ना गलबलून आलं होतं. तर एका नर्सनी तिला एक गि़फ्ट ही दिलं त्यावेळी ती आनंदून गेली होती. जेंव्हा डॉक्टर आणि नर्सनी विचारलं तुला आता घरी गेल्यावर काय करायचं आहे तेंव्हा तिनं सांगितलं की आम्ही मुबंईला राहतो त्यामुळे मला तिथे मातीत खेळता येत नाही म्हणून मी घरी गेले मातीत खेळणार आहे. दवाखान्यात बसून खूप कंटाळा आला आहे. तसेच बिस्कीट आणि मोसंबी खायची आहे.

कळंब तालुक्यात अशी आहे स्थिती
कळंब तालुक्यात पाथर्डी व हावरगाव येथील प्रत्येकी दोन, शिराढोण येथील चार, भाट शिरपूरा येथील एक तर कळंब शहरात सहा अशा एकूण पंधरा रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यापैकी दहा व्यक्तींवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. तर पाच जणांना घरी उपचार करून सोडण्यात आले आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या