27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeतरुणांना 'टिक टॉक' व्हिडिओ बनवणं पडलं महागात, नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू

तरुणांना ‘टिक टॉक’ व्हिडिओ बनवणं पडलं महागात, नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

Tik Tok Death News

वाराणसी: उत्तरप्रदेशच्या वाराणसीमध्ये शुक्रवारी मोठी दूर्घटना घडली. इथल्या सिपहिया घाटावर गंगेत बुडून पाच तरुणांचा मृत्यू झालाय. हे पाच तरुण नदीवर आंघोळीला गेले होते. नदीच्या तीरावर रेतीवर थांबून टिक टॉक व्हिडिओ बनवत असतांना एक-एक करून पाचही तरुणांचा गंगेत बुडून मृत्यू झाला. आजूबाजूचे लोक त्यांना वाचविण्यासाठी धावले, पण त्यांना यश मिळालं नाही. यानंतर पोलिसांनी गोताखोरांच्या मदतीनं पाच तरुणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले.

रामनगर पोलीस स्टेशनच्या वारीगढही इथला १७ वर्षीय तौसिफ, १४ वर्षीय फरदीन, १५ वर्षीय शैफ, १५ वर्षीय रिझवान आणि १४ वर्षीय सकी आपल्या इतर दोन मित्रांसोबत घरापासून जवळपास १ किलोमीटर दूर गंगा नदीत आंघोळीला गेले होते.

पाच किशोरवयीन तरुण पहिले रेतीवर टिक टॉक व्हिडिओ बनवत होते आणि यानंतर ते नदीत आंघोळीला गेले. या दरम्यान एक तरुण बुडायला लागला, ज्याला वाचविण्याचा प्रयत्न करतांना आणखी चार तरुण बुडाले.

Read More  नांदेडच्या गोवर्धन घाट स्मशानभूमीत कोरोनाबाधित महिलेच्या अंत्यविधीस विरोध

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गोताखोरांच्या मदतीनं पाचही तरुणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. मृतदेह ट्रामा सेंटर इथं नेले, त्यानंतर डॉक्टरांनी ते तपासून ते मृत पावल्याचं सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच तरुण घरातून कुठल्या तरी कामाचं कारण देत बाहेर पडले होते, कुणी घरी गंगेत आंघोळीला जातोय, हे कारण सांगितलं नव्हतं.

सिपहिया घाटादरम्यान सध्या गंगा नदीच्या मध्यावर खूप रेती बाहेर आलेली आहे. तिथं पाच तरुण टिक टॉक व्हिडिओ बनविण्यासाठी गंगा नदीतील त्या रेती जवळ पोहोचले. व्हिडिओ बनविल्यानंतर एक तरुण नदीत बुडायला लागला, तेव्हा दुसरा त्याला वाचवायला गेला आणि बघता-बघता एकमेकांना वाचवायला गेलेले पाचही तरुण बुडाले. त्यांचा आवाज ऐकून काही नाविक आपली नाव घेऊन त्यांना वाचविण्यासाठी पळाले, मात्र जोपर्यंत ते तिथं पोहोचले तोपर्यंत तरुण बुडाले होते. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी गोताखोरांच्या मदतीनं घटनास्थळ गाठलं. तब्बल दोन तास शोध घेतल्यानंतर पाचही तरुणांचे मृतदेह सापडले आणि त्यांना लाल बहादूर शास्त्री हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. तिथं पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या