23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeइलेक्ट्रिक बाईकमुळे साता-यात तरुणीचा मृत्यू

इलेक्ट्रिक बाईकमुळे साता-यात तरुणीचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

सातारा : पेट्रोल-डिझेलच्या वाढत असलेल्या किमतींमुळे प्रत्येक जण आता पर्याय शोधायला लागला आहे. यावर उत्तम पर्याय म्हणजे इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करणे. पण थोडं थांबा आणि विचार करा. इलेक्ट्रिक वाहन घेणं तुमच्या जिवावर बेतू शकतं.

असाच एक प्रकार साता-याच्या कराड तालुक्यातील म्होप्रे गावात घडला आहे. इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावत असताना शॉक लागला आणि २३ वर्षीय शिवानी अनिल पाटील या तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

शिवानी पाटील म्होप्रे गावची रहिवासी होती. ती इलेक्ट्रिक बाईक वापरत असे.
बाहेरगावी जाण्याचे शिवानी पाटीलचे नियोजन होते. यासाठी शिवानी पाटीलने दुचाकीची बॅटरी तपासून पाहिली. बॅटरीचे पॉईंट कमी होते त्यामुळे तिने बॅटरी चार्जिंगला लावण्याचे कीट बाहेर काढले. बॅटरी चार्जिंगला लावण्यास सुरुवात केली. मात्र दुर्दैवाने शिवानीला शॉक लागला. त्यात ती जखमी झाली. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शिवानीचा मृत्यू झाला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या