24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रयुवराजांची कायमच दिशा चुकते...

युवराजांची कायमच दिशा चुकते…

एकमत ऑनलाईन

शिवसेनेतील बंडखोरांकडून आता आदित्य ठाकरेंवर व्यक्तिगत हल्ला
मुंबई: विरोधकांनी सत्ताधा-यांविरोधात विधानभवनात आंदोलन करत आतापर्यंतच पावसाळी अधिवेशन गाजव मात्र, आज विधानभवनात काही वेगळंच चित्र पाहायला मिळाले. यावेळी सत्ताधा-यांकडून महाविकास आघाडीविरोधात हातात पोस्टर घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिंदे गटातील आमदारांनी हे आंदोलन केले. यावेळी त्यांच्या हातातील पोस्टर हे अत्यंत इन्टरेस्टिंग होते. ‘युवराजांची कायमच दिशा चुकली’ असे पोस्टर झळकवत आदित्य ठाकरेंवर व्यक्तिगत हल्ला करण्यात आला.

शिंदे गट आणि भाजप आक्रमक
आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. पण, आज विरोधकांकडून नाही तर सत्ताधा-यांकडून आंदोलन करण्यात आलं. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे पोस्टर हातात घेऊन हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी ‘युवराजांची कायमच दिशा चुकली’, असे या पोस्टरवर लिहिण्यात आले होते. यावर आदित्य ठाकरे यांची घोड्यावर उलट्या दिशेने बसलेला फोटोही आहे. वर एकीकडे हिंदुत्व आणि दुस-या दिशेने महाविकास आघाडी दाखवण्यात आलं आहे. तर आदित्य हे हिंदुत्वाकडे पाठकरुन बसलेले आहेत आणि ते महाविकास आघाडीच्या दिशेने बोट दाखवताना दिसत आहेत.

पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकामंधील संघर्ष पाहायला मिळत आहे. काल विधानभवनात सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये बाचाबाची झाली, हा वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला. त्यानंतर आज शिंदेगटाकडून थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीवरही हल्लाबोल करण्यात आला आहे. ‘लवासाचे खोके, बारामती ओके’, ‘दाऊदचे खोके, महाविकास आघाडी ओके’, अशा घोषणा यावेळी शिंदे गटाकडून देण्यात आल्या. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंचे जवळचे समजले जाणारे प्रकाश सुर्वेही या आंदोलनात सामील झाले होते.

मला या सगळ्यांची खरोखरच कीव येते – आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांनी पोस्टरबाजी करणा-या शिंदे गटाच्या आमदारांवर सडकून टीका केली. यांच्यावर घरात चांगले संस्कार झाले असते तर मुळात यांनी गद्दारी केली नसती आणि आता असे बिचा-यांसारखे उभे राहिले नसते, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. आदित्य यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढण्याचे शिंदे गटाचे चॅलेंजही स्वीकारले. मी कधीही राजीनामा द्यायला तयार आहे. शिंदे गटाच्या ४० आमदारांनीही त्यांचा राजीनामा द्यावा. विधानसभा विसर्जित करून संपूर्ण राज्यातच निवडणूक घ्या, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

या बंडखोर आमदारांना आम्ही काय कमी दिले होते. कोणताही मुख्यमंत्री सोडणार नाही, अशी खाती त्यांना दिली होत. पण, आज हे सर्वजण आमच्याच पाठीत खंजीर खुपसून आमच्यासमोर उभे आहेत. आम्हाला एकटे पाडण्यासाठी, आमच्यावर टीका करण्यासाठी या बंडखोर आमदारांना गळ्यात काय-काय घालून उभे केले जात आहे. आम्हाला एकटं पाडा, टीका करा, तर मंत्रिपदं मिळतील, असे या बंडखोर आमदारांना सांगितले जात असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या