20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeमहाराष्ट्रजिल्हा परिषदेची रणधुमाळी लवकरच ; अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

जिल्हा परिषदेची रणधुमाळी लवकरच ; अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

एकमत ऑनलाईन

लातूर जि.प. सर्वसाधारण महिलेसाठी राखीव
लातूर : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामविकास विभागाला मुदत संपणा-या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता, ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे. लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आहे.

दरम्यान एकीकडे राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांची सुनावणी सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना दुसरीकडे ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आल्याने येत्या काही काळात निवडणूक जाहीर होणार का याकडे ग्रामीण भागातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

जिल्हानिहाय आरक्षण
ठाणे : सर्वसाधारण
पालघर : अनुसूचित जमाती
रायगड : सर्वसाधारण
रत्नागिरी : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग : सर्वसाधारण
नाशिक : सर्वसाधारण (महिला)
धुळे : सर्वसाधारण (महिला)
जळगाव : सर्वसाधारण
अहमदनगर : अनुसूचित जमाती
नंदुरबार : अनुसूचित जमाती (महिला)
पुणे : सर्वसाधारण

सोलापूर : नागरिकांचा मागास प्रवर्ग
सातारा : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली : सर्वसाधारण (महिला)
कोल्हापूर : सर्वसाधारण (महिला)
औरंगाबाद : सर्वसाधारण
बीड : अनुसूचित जाती

नांदेड : नागरिकांचा मागास प्रवर्ग
उस्मानाबाद : सर्वसाधारण (महिला)
परभणी : अनुसूचित जाती
जालना : नागरिकांचा मागास प्रवर्ग
लातूर : सर्वसाधारण (महिला)
हिंगोली : सर्वसाधारण (महिला)
अमरावती : सर्वसाधारण (महिला)
अकोला : सर्वसाधारण (महिला)

यवतमाळ : सर्वसाधारण
बुलडाणा : सर्वासाधारण
वाशिम : सर्वसाधारण
नागपूर अनुसूचित जमाती
वर्धा : अनुसूचित जाती (महिला)

चंद्रपूर :अनुसूचित जाती (महिला)
भंडारा : अनुसूचित जमाती (महिला)
गोंदिया : नागरिकांचा मागास प्रवर्ग
गडचिरोली : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या