मुंबई, 29 मे : प्रख्यात कवी आणि गीतकार योगश यांचे आज निधन झाले. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहत कवी योगेश यांना श्रद्धांजली वाहिली. ‘योगेश’ अशा नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या प्रसिद्ध गीतकाराचे पूर्ण नाव योगेश गौर असे होते. त्यांच्या जन्म 19 मार्च 1943 मध्ये झाला होता. आज वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘कही दूर जब दिन ढल जाए’, ‘जिंदगी कैसी ये पहेली’ या ‘आनंद’ चित्रपटातील गाण्यांसाठी कवी योगेश प्रसिद्ध होते.
लतादीदींनी त्यांच्या पोस्टमध्ये कवी योगेश यांना’हृदयाला भिडणारे गीत लिहणारे कवी योगेश’ असे संबोधले आहे. लतादीदींनी यामध्ये असंही म्हटलं आहे की कवी योगेश यांनी लिहिलेली अनेक गाणी त्यांनी गायली होती.
Read More आम्हा दोघांमध्ये तिसऱ्याच्या मध्यस्थीची गरज नाही, चीनने ट्रंप यांची ऑफर धुडकावली
कवी योगेश यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील लखनऊ याठिकाणी झाला होता. ‘कही दूर जब दिन ढल जाए’, ‘जिंदगी कैसी ये पहेली’, ‘रिमझिम गिरे सावन’ यासारखी सदाबहार गाणी लिहण्याबरोबरच त्यांनी काही टेलिव्हिजन मालिकांसाठी लेखक म्हणून देखील काम केले होते.
Mujhe abhi pata chala ki dil ko chunewale geet likhnewale kavi Yogesh ji ka aaj swargwas hua. Ye sunke mujhe bahut dukh hua.Yogesh ji ke likhe kai geet maine gaaye. Yogesh ji bahut shaant aur madhur swabhav ke insan the. Main unko vinamra shraddhanjali arpan karti hun.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) May 29, 2020