26.6 C
Latur
Friday, November 7, 2025
Homeराष्ट्रीयमुलांसाठी आधार बायोमेट्रिक अपडेटचे शुल्क माफ

मुलांसाठी आधार बायोमेट्रिक अपडेटचे शुल्क माफ

देशभरातील ६ कोटी मुलांना होणार फायदा आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात यूआयडीएआयने ७-१७ वर्ष वयोगटातील मुलांसाठी आधार बायोमेट्रिक अपडेटचे शुल्क माफ केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ही सवलत १ ऑक्टोबर पासून लागू झाली असून ती एक वर्षासाठी उपलब्ध असेल. यामुळे सुमारे ६ कोटी मुलांना फायदा होईल. मंत्रालयाने म्हटले आहे की, मोफत बायोमेट्रिक अपडेटमुळे मुलांना शिक्षण, शिष्यवृत्ती आणि थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेचा लाभ घेणे सोपे होईल.

कोणत्या वयात होते बायोमेट्रिक?
पाच वर्षांखालील मुलांची आधार नोंदणी त्यांचे छायाचित्र, नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि जन्म प्रमाणपत्राद्वारे होते. या वयात बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बुबुळांचे बायोमेट्रिक्स घेतले जात नाहीत, कारण ते पूर्णपणे विकसित झालेले नसतात. यामुळे, विद्यमान नियमांनुसार, मुलाचे वय ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, आधारमध्ये बोटांचे ठसे, डोळ्यांच्या बुबुळांचे स्कॅन आणि छायाचित्र अपडेट अनिवार्य आहे. याला पहिले अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट म्हटले जाते.

१५ वर्षांनंतर पुन्हा अपडेट आवश्यक
१५ वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर, पुन्हा बायोमेट्रिक्स अपडेट करणे आवश्यक आहे, ज्याला दुसरा एमबीयू म्हणतात. ५-७ आणि १५-१७ वर्षे वयोगटात केलेले हे अपडेट आता मोफत असतील. यापूर्वी, या वयोगटाबाहेर प्रत्येक एमबीयूसाठी १२५ रुपये शुल्क आकारले जात होते. नव्या निर्णयामुळे ५ ते १७ वर्षे वयोगटातील सर्व मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट पूर्णपणे मोफत झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR