22.2 C
Latur
Friday, September 13, 2024
Homeराष्ट्रीयजम्मू-काश्मीरमधील भीषण चकमक

जम्मू-काश्मीरमधील भीषण चकमक

लष्कराच्या कॅप्टनला वीरमरण ४ दहशतवाद्यांचा खात्मा

डोडा : जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू असून, या चकमकीत भारतीय लष्कराच्या एका अधिका-याला वीरमरण आले आहे. तर या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्रान घालण्यात आले आहे. डोडा जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीदरम्यान, भारतीय लष्कराच्या एका कॅप्टनला वीरमरण आले आहे अशी माहिती एका संरक्षण अधिका-याने दिली आहे.

डोडा येथील पटनीटॉपमधील जंगलामध्ये सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये काल संध्याकाळपासून चकमक सुरू आहे. येथून दहशतवादी हत्यारे सोडून पळाले होते, अशी माहिती लष्कराने दिली आहे घटनास्थळावरून अमेरिकन बनावटीची एम ४ रायफल जप्त करण्यात आली आहे. तर तीन बॅगमधून काही स्फोटकंही सापडली आहेत. दरम्यान, हे दहशतवादी अकर भागातील एका नदीकिनारी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर जवानांनी या भागाला घेराव घातला. लष्कराच्या हालचालींची कुणकूण लागल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबारात लष्कराचे एक वरिष्ठ अधिकारी गोळ्या लागून गंभीर जखमी झाले. नंतर त्यांचा मृत्यू झाला.

पाच दिवसांत ४ था हल्ला
काश्मीरमध्ये मागच्या पाच दिवसांमध्ये झालेली ही चौथी चकमक आहे. यापूर्वी ११ ऑगस्ट रोजी किश्तवाड जिल्ह्यातील जंगलामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. तर याच दिवशी उधमपूरमधील वसंतगडधील जंगलातही लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला होता. तर १० ऑगस्ट रोजी अनंतनागमधील कोकरानाग येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात हवालदार दीपक कुमार यादव आणि लान्स नायक प्रवीण शर्मा यांना हौतात्म आले होते. तर ३ जवान आणि दोन नागरिक जखमी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR