नोटीस पाठवली म्हणजे नाव वगळले नाही!

नवी दिल्ली : देशभरात राबवण्यात येत असलेल्या मतदार यादी दुरुस्ती अर्थात एसआयआर मोहिमेमध्ये हजारो लोकांची नावे वगळण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह अनेक दिग्गजांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्यानंतर चौफेर टीका व्हायला सुरुवात झाली आहे.

अखेर निवडणूक आयोगाने या नोटिसीवर स्पष्टीकरण दिले आहे. निवडणूक आयोगाने मतदाराला नोटीस पाठवली म्हणजे त्या मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले असे होत नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

दिल्ली मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने यासंबंधी तत्काळ खुलासा केला आहे. दिल्लीतील ज्या व्यक्तींना नोटीस पाठवण्यात आली आहे ती सिस्टम जनरेटेड आहे. ज्या मतदारांनी कागदपत्रे जमा करताना किंवा मतदार नोंदणीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरली आहे, अशा मतदारांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सध्या जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. कोणत्याही मतदारांची नावे त्यांना माहिती दिल्याशिवाय वगळण्यात येणार नाहीत, असेही या निवडणूक अधिका-याने सांगितले आहे.

निवडणूक आयोगाकडून ज्यांना नोटिसा मिळाल्या आहेत. त्या मतदारांनी आपले म्हणणे दाखल करावे. तसेच आवश्यक कागदपत्रे निवडणूक नोंदणी अधिका-याकडे किंवा बूथ लेवल अधिका-याकडे जमा करावीत. मतदारांचे काही दावे आणि हरकती असल्यास एसआयआर प्रक्रियेदरम्यान ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करावीत. मतदार निवडणूक नोंदणी अधिका-यांकडे आपल्या मतदारसंघातील संबंधित आवश्यक कागदपत्रे २९ ऑक्टोबरपर्यंत पडताळणी करू शकतील. ४ नोव्हेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होईल.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41
Video thumbnail
शिक्षक द्या, नाहीतर कार्यालयातच शाळा! शिरूर अनंतपाळमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अनोखे आंदोलन
02:56
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03

Latest news