एसीच्या स्फोटामुळे रुग्णालयात आग

आदिलाबाद : तेलंगणातील आदिलाबाद येथील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (आरआयएमएस) रुग्णालयाच्या स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिटला(एसएनसीयू) सोमवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. आगीच्या वेळी वॉर्डमध्ये असलेल्या २८ बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

सोमवारी रात्री सुमारे ११.५० वाजण्याच्या सुमारास रठउवमध्ये अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, एसीमध्ये झालेल्या विद्युत शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज आहे. आगीमुळे काही वेळातच संपूर्ण वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात धूर आणि ज्वाळा पसरल्या. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागल्याचे लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचारी आणि पालकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. बालकांना बाहेर काढण्यासाठी वॉर्डच्या काचा फोडण्यात आल्या. खबर मिळताच अग्निशमन दलाची गाडी रुग्णालयात दाखल झाली आणि जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीचा रुग्णालयाच्या इतर भागात फैलाव होऊ नये, यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या.

या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. त्यापैकी एका बालकाचे वय अवघे पाच दिवस होते. आगीतून वाचवण्यात आलेल्या इतर बालकांना तातडीने उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. काही बालकांना धुरामुळे श्वसनाचा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आगीमागील नेमके कारण काय होते, तसेच दुर्घटनेच्या वेळी रुग्णालयातील विद्युत यंत्रणा, एसी यंत्रणा आणि अग्निसुरक्षा व्यवस्था योग्य प्रकारे कार्यरत होती का, याची तपासणी केली जात आहे. कोणत्याही प्रकारची हलगर्जी किंवा निष्काळजीपणा या दुर्घटनेला कारणीभूत ठरला का, याचाही तपास केला जाणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41
Video thumbnail
शिक्षक द्या, नाहीतर कार्यालयातच शाळा! शिरूर अनंतपाळमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अनोखे आंदोलन
02:56
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03

Latest news