28.1 C
Latur
Friday, January 16, 2026
Homeमहाराष्ट्रभाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार

अंबरनाथ : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना अंबरनाथ शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री गोळीबार केल्याने संपूर्ण शहरात दहशत पसरली आहे.

ही घटना मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजनुसार, दुचाकीवरून आलेले दोन अज्ञात इसम अचानक कार्यालयासमोर थांबले आणि क्षणाचाही विलंब न करता कार्यालयाच्या दिशेने ३ ते ४ राऊंड फायर केले. गोळीबाराचा आवाज ऐकताच कार्यालयातील सुरक्षारक्षक बाहेर आला. मात्र, त्यालाही लक्ष्य करून हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सुरक्षारक्षक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेचे दृश्य कार्यालयाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात स्पष्टपणे कैद झाले असून हल्लेखोरांचा थरारक प्रकार त्यात दिसून येतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR