मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. दहिसर येथे ही घटना घडली असून अभिषेक घोसाळकर यांना करूणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मुरीस भाई नावाने प्रसिद्ध असलेला हा व्यक्ती स्वतःला समाजसेवक म्हणतो. एक वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्याच्या विरोधात दहिसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता. मॉरिस भाई हा आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याचं बोललं जातंय.