‘तारा’ची पहिली चाचणी यशस्वी

ओडिशा : संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळकटी देणारा एक मोठा टप्पा भारताने गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय हवाई दलाने ७ मे २०२६ रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवर टॅक्टिकल अ‍ॅडव्हांस्ड रेंज ऑगमेंटेशन या स्वदेशी शस्त्रास्त्राची पहिली यशस्वी चाचणी घेतली. ही भारताची पहिली स्वदेशी ग्लाइड शस्त्रास्त्र प्रणाली असून यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद अनेक पटींनी वाढणार आहे.

‘तारा’ हे एक मॉड्यूलर रेंज एक्स्टेंशन किट आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे तंत्रज्ञान एखाद्या सामान्य आणि अनगाइडेड (ज्याचा मार्ग नियंत्रित करता येत नाही अशा) बॉम्बला अत्याधुनिक प्रिसिजन गाइडेड (अचूक लक्ष्य भेदणा-या) शस्त्रात रूपांतरित करते. या किटच्या वापरामुळे जमिनीवरील शत्रूची ठिकाणे उद्ध्वस्त करण्याची क्षमता आणि अचूकता कमालीची वाढते. हे देशातील पहिले ग्लाइड शस्त्र आहे जे अत्याधुनिक असूनही अत्यंत कमी खर्चात तयार करण्यात आले आहे. यामुळे महागड्या क्षेपणास्त्रांवरील अवलंबित्व कमी होईल.

संपूर्णपणे स्वदेशी बनावट
या प्रगत प्रणालीची रचना हैदराबाद येथील रिसर्च सेंटर’ आणि डीआरडीओच्या इतर प्रयोगशाळांनी मिळून केली आहे. या प्रकल्पात डेव्हलपमेंट कम प्रॉडक्शन पार्टनर्स आणि भारतातील अनेक संरक्षण उद्योगांनी मोलाचा वाटा उचलला आहे. विशेष म्हणजे, चाचणी यशस्वी होताच या उद्योगांनी आता त्याचे उत्पादनही सुरू केले आहे.

संरक्षण मंत्र्यांककडून कौतुक
या ऐतिहासिक यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, हवाई दल आणि संबंधित उद्योगांचे अभिनंदन केले. भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेला एका नव्या उंचीवर नेणारे हे महत्त्वाचे पाऊल आहे अशा शब्दांत त्यांनी या यशाचा गौरव केला. तसेच, डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनीही या प्रकल्पातील शास्त्रज्ञ आणि कर्मचा-यांच्या परिश्रमांचे कौतुक करत ही भारतासाठी एक मोठे यश असल्याचे म्हटले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूर - मिनी मार्केट जवळील पेट्रोल पंपावर स्कूटीने घेतला अचानक पेट #marathilivenews #maharashtranews
00:42
Video thumbnail
Latur|चोला फायनान्सचा मॅनेजर लाखो रुपये घेऊन फरार?
06:08
Video thumbnail
Latur|मोदी सरकारचा मोठा निर्णय? उज्ज्वला महिलांना बसला धक्का!
04:49
Video thumbnail
Nanded|महायुतीत मतभेद नाहीत;हेमंत पाटील यांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
01:21
Video thumbnail
Latur|रुग्णालयाच्या जागेवर बुलडोजर;अतिक्रमण हटवताना आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवला जीव!
02:49
Video thumbnail
Latur|मुरुड शहर कचराकोंडीत; ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार
02:22
Video thumbnail
Latur|गॅस टंचाईमुळे पुन्हा पेटल्या चुली; लाकडाला आले सोन्याचे दिवस
04:34
Video thumbnail
Nanded Accident|ट्रक-टँकरच्या अपघातात एक जण जागीच ठार
00:32
Video thumbnail
Nanded Murder|सोनखेड पेट्रोल पंपावर प्लंबरचा खून;मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
00:34
Video thumbnail
Nanded |इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर; फळबागेतून दरवर्षी लाखोंची कमाई
04:26
Video thumbnail
विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा: विद्यार्थ्यांची कविता #Maharashtra #VilasraoDeshmukh #Marathi
02:48
Video thumbnail
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त NDA बैठकीत मोदींनी नेत्यांसोबत घेतला 'झालमुडी'चा आस्वाद
00:37
Video thumbnail
अभिनेत्री सारा अर्जुनने वडिलांसह घेतले बाबा महाकालांचे दर्शन; उज्जैनच्या 'भस्म आरती'त झाली लीन!
00:30
Video thumbnail
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने गोदावरीत बोट बुडाली; दोन महिलांना गमवावा लागला जीव.
00:34
Video thumbnail
मांजराचा 'दिलजले' अंदाज! गर्लफ्रेंडला दुसऱ्या बोक्यासोबत पाहून उंदराला दिलं जीवदान, व्हिडिओ व्हायरल!
00:23

Latest news