यवतमाळ : पोहरा देवीला नवस फेडायला जाणा-या भाविकांवर काळाने घाला घातला. या भीषण अपघातात पाच भाविक जागीच ठार झाले तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. पुसद-दिग्रस मार्गावर हा भीषण अपघात झाला. बेलगव्हान घाटात नाल्याच्या पुलावरुन ऍपे रिक्षा थेट खाली कोसळली. वाहनावरील नियंत्रण हुकल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात दुपारी १२ वाजता झाला. ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जखमींमध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे.
पुसद तालुक्यातील मोहा तांडा, गोकी तांडा आणि पांढुर्ना गावातील भाविक पोहरादेवी येथे नवस फेडण्यासाठी जात होते. त्यांनी सकाळीच सामानाची आवरासावर केली. नवस फेडण्यासाठीचे साहित्य घेतले. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे हे सर्व जण नवस फेडण्यासाठी जात होते. पण बेलगव्हान घाटातच काळाने त्यांच्यावर झडप घातली. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला.
पुसद ग्रामीण रुग्णालयात उपचार
मोहा तांडा, गोकी तांडा आणि पांढुर्ना गावातील भाविक पोहरादेवी येथे नवस फेडण्यासाठी जात होते. बेलगव्हान घाटात वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ऑटो पुलावरुन थेट खाली कोसळला. या ऍपे रिक्षामध्ये १५-२० जण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांना बाहेर पडायला वेळच मिळाला नाही. यातील पाच जण ठार झाले तर अकरा जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पुसद ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
झाला मोठा आवाज
हा अपघात झाला, तेव्हा ऍपे रिक्षामध्ये १५-२० जण होते. ऑटो पुलावरुन थेट खाली कोसळताच मोठा आवाज झाला. भाविकांच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी धावले. त्यांनी भाविकांना तातडीने मदत केली. पोलीस यंत्रणा धावून आली. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले.