28.4 C
Latur
Friday, May 16, 2025
Homeमहाराष्ट्रपुणे विमानतळावरून पाच उड्डाणे रद्द

पुणे विमानतळावरून पाच उड्डाणे रद्द

पुणे : ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानमधील काही शहरांवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर उत्तरेकडील काही महत्त्वाच्या विमानतळांवरील नागरी उड्डाण सेवा गेल्या तीन दिवसांपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

यामुळे पुणेविमानतळावरून होणा-या काही उड्डाणांवर परिणाम झाला असून शनिवारी विविध मार्गांवरील पाच विमानसेवा रद्द करण्यात आल्या. तर युद्धजन्य परिस्थिती निवळल्याने परिस्थिती रात्री उशिरा इतर सर्व उड्डाणे पूर्व नियोजित वेळेनुसार सुरू होणार आहे अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.

रद्द झालेली उड्डाणे
– अमृतसर – पुणे (६ ई ६१२९)
– चंडीगड – पुणे (६ ई ६८१)
– कोचीन – पुणे (६ ई ७२१)
– पुणे – चंडीगड (६ ई २४२)
– पुणे – अमृतसर (६ ई ७२१)

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR