पुणे : प्रतिनिधी
मराठी भाषेत दिवाळी अंकांना मोठी परंपरा आहे.मराठी सोबतच आता इंग्रजी भाषेतील दिवाळी अंकाचाही आस्वाद वाचकांना घेता येणार आहे.ज्येष्ठ संपादक दिनकर शिलेदार यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून दिनमार्क पब्लिकेशनतर्फे इंग्रजी भाषेतील भारतातील पहिलावहिला दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आला.
विशेष म्हणजे पत्रकारांच्या हस्ते मी’ इंग्रजी दिवाळी अंकाचे,तसेच मराठीतील संग्रा ‘छंद’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
‘मी’ या इंग्रजी दिवाळी विशेषांकाची संकल्पना मांडताना शिलेदार म्हणाले, जगभरातील व्यावसायिक ब्रँडची ओळख,त्यांची यशोगाथा मांडणारा हा अंक आहे. ब्रँड म्हणजे केवळ नाव,लोगो,उत्पादन किंवा बाजारपेठेतील स्थान नव्हे,तर दीर्घकाळ जपलेला विश्वास,गुणवत्ता,मूल्ये आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी हा विचार अंकातून मांडण्यात आला आहे .
उद्योजक,व्यावसायिक,संशोधक,नवकल्पना आणि नेतृत्व क्षेत्रात कार्यरत व्यक्तींचा प्रवास,त्यांचे अनुभव,संघर्ष आणि यशामागील भूमिका यांचा वेध विशेषांकात घेण्यात आला आहे.
दोन्ही दिवाळी अंकांच्या माध्यमातून व्यावसायिक आणि साहित्यिक क्षेत्रातील विचारांची देवाणघेवाण तसेच निसर्गसंवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
















