22.9 C
Latur
Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्रप्रथमच मनसे-ठाकरे गटाचे एकत्र आंदोलन

प्रथमच मनसे-ठाकरे गटाचे एकत्र आंदोलन

बुधवारी अजाईल कंपनीच्या विरोधात आंदोलन

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीची चर्चा सुरु आहे. या युतीबाबत सकारात्मक संकेतही मिळत आहेत. अशातच आता या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ये एकत्र येणार आहेत. उद्या मुंबईत मनसे आणि ठाकरे गटाच आंदोलन होणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मनसे आणि ठाकरे गट इंडिगो अंतर्गत येणा-या अजाईल कंपनीच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. बुधवारी ११ वाजता प्रादेशिक मुंबईतील कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आणि ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत तसेच मनसेचे वरळी विभाग अध्यक्ष यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडणार आहे. एकीकडे ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार अशा चर्चा सुरु असताना मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे हे आंदोलन सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. याआधीही दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी भावना व्यक्ती केली होती, त्यानंतर आता कार्यकर्ते एकत्र रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहेत.

ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा का सुरु झाली?
चित्रपट अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत राज यांनी मनसे-शिवसेनेच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना राज यांनी, ‘एकत्र येऊन राहणे मला कठीण वाटत नाही. महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या अस्तित्वासाठी आमचे वाद आणि भांडणे खूपच लहान आहेत असे विधान केले होते. तेव्हापासून या युतीची चर्चा सुरु झाली. यानंतर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया देताना, मी छोटे छोटे वाद बाजूला ठेवण्यास तयार आहे, महाराष्ट्रातील लोकांना जे हवे आहे ते होईल असे म्हटले होते. त्यामुळे या युतीच्या चर्चांना अधिक जोर आला. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांच्या कार्यक्रमांमध्ये भेटीगाठीही झाल्या. मात्र अजून युतीचा निर्णय अंतिम झालेला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR