25 C
Latur
Wednesday, June 18, 2025
Homeमहाराष्ट्रमाजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन

माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन

पुणे : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे.

विश्वासरावांचे वडील कृष्णराव गांगुर्डे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अतिशय जवळचे स्नेही होते. त्यामुळे विश्वासरावांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सहवास लाभला. सन १९७८ मध्ये दत्तवाडी- राजेंद्रनगरमधून ते पहिल्यांदा पुणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले.

त्यानंतर १९९२-१९९७ काळात गणेशखिंड भागातून त्यांनी नगरसेवकपद भूषविले.विश्वासराव हे विचारवंत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. आणीबाणीविरोधात त्यांनी मोठा संघर्ष उभा केला. सन १९९२-१९९५ या काळात ते पुण्याचे शहराध्यक्ष होते. भाजपा शहराध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्षाचे काम पुणे शहरात तळागाळापर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले.

सन १९८०-८५ आणि १९८५-९० दोनवेळा पर्वती विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. मात्र दुर्दैवाने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, सन १९९९ मध्ये ते पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. या काळात त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडविले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR