सोलापूर : सुमारे ४२० बचत गटातील महिलांना लाखो रुपयास फसवणूक केल्याप्रकरणी सिद्धेश्वर परशुराम भिसे २९ रा सोलापूर यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.एस.कर्णिक यांनी जामीन मंजूर केला. या हकीकत अशी की, सिद्धेश्वर भिसे हा भारत फायनान्स कंपनीमध्ये फिल्ड ऑफिसर म्हणून कामात होता. दि १/२/२०२१ ते २६/११/२०२२ या कालावधीत तो केमवाडी, वडाळा, बाणेगाव, भोगाव, कारंबा या गावातील बचत गटातील महिलांचे कर्ज मंजूर करून देणे व मंजूर झालेल्या कर्जाचे हप्ते गोळा करण्याचे काम दर आठवड्याला करीत असे त्या कालावधीत त्याने बचत गटातील महिलांची ए.इ.पी.एस मशीनवर त्यांचे अंगठे व आधार कार्ड घेऊन त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांचे नावे परस्पर कर्जे काढून त्याचा सहकारी मित्र नल्ला यांच्याशी संगणमत करून ४२० बचत गटातील महिलांची सुमारे २१,०६,६२५/- रुपयाची फसवणूक करून ती रक्कम स्वतःसाठी वापरली, अशा आशयाची फिर्याद दादासाहेब मेटकरी याने फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दिली होती.
त्यावर सिद्धेश्वर याने जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर सिद्धेश्वर याने एडवोकेट रितेश थोबडे यांचे मार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस अॅड. रितेश थोबडे यांनी आपले युक्तीवादात सदर गुन्ह्या हा कागदोपत्री स्वरूपाचा असल्याने पुरावा फुटण्याची कोणतीही शक्यता नाही असा मुद्दा मांडला, तो ग्रा धरून न्यायमूर्तींनी १५०००/- रुपयांच्या जातमुचलक्यावर व काही पैसे भरण्याच्या अटीवर सिद्धेश्वर यास जामीन मंजूर केला. यात आरोपीतर्फे अॅड. रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे अॅड. विरा शिंदे यांनी काम पाहिले.