26.6 C
Latur
Friday, November 7, 2025
Homeमहाराष्ट्र२०२६ नंतर शेतक-यांना मोफत वीज देणार

२०२६ नंतर शेतक-यांना मोफत वीज देणार

मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेतक-यांना शब्द लाडक्या बहिणींची योजना सुरूच राहील

फलटण : आम्ही सुरु केलेल्या योजना कधीच बंद होऊ देणार नाही. जोपर्यत देवाभाऊ, शिंदे साहेब आणि अजितदादा आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी देत २०२६ नंतर शेतक-यांना ३६५ दिवस दिवसा १२ तास वीज देणार, पाच वर्ष मोफत वीज देणार असे देखील यावेळी फडणवीस यांनी म्हटले आहे. ते सातारा जिल्ह्यातील फलटण येथे बोलत होते. दरम्यान अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यासाठी आता सरकारकडून योजनेच्या केवायसीला सुरुवात झाली आहे.

ज्या कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. सरकारची ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे. मात्र सध्या ही योजना चांगलीच चर्चेमध्ये आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत.

ही योजना सुरू करताना सरकारने काही अटी आणि नियम घातले होते. मात्र पात्र नसताना देखील अनेक महिलांनी आता या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत अशा महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात येत आहेत. काही ठिकाणी तर सरकारी नोकरीमध्ये असताना देखील महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार समोर आला आहे, त्यामुळे सरकारकडून आता अशा प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेली असून या महिलांची नावे वगळण्यात येत आहेत.

मात्र दुसरीकडे विरोधकांकडून लवकरच ही योजना बंद होणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे, लाडकी बहीण योजनेतून काही महिलांची नाव वगळी जात आहेत, त्यावर देखील विरोधकांकडून प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. ही योजना फक्त निवडणुकीपूरतीच होती अशी टीका विरोधकांकडून सुरू आहे, यावर आता पुन्हा एकदा फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना मोठे वक्तव्य केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR