संघर्षातून विधानसभेपर्यंत! लोकांच्या घरी झाडू-पोछा करणाऱ्या कल्पिता माझी आता बनल्या ‘आमदार’

कोलकाता: जिद्द आणि चिकाटी असेल तर परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे पश्चिम बंगालमधील कल्पिता माझी (Kalita Majhi) यांनी सिद्ध करून दाखवले आहे. दुसऱ्यांच्या घरी झाडू-पोछा करून महिना २,५०० रुपये कमावणाऱ्या कल्पिता माझी आता थेट विधानसभेत पोहोचल्या असून त्यांची ही यशोगाथा सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे.

कल्पिता माझी यांचे आयुष्य अत्यंत संघर्षाचे राहिले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या गेली अनेक वर्षे लोकांच्या घरी घरकाम करत होत्या. महिना जेमतेम अडीच हजार रुपयांत त्या आपल्या संसाराचा गाडा ओढत होत्या. मात्र, समाजाप्रती असलेली त्यांची तळमळ आणि कामाची जिद्द पाहून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले.

पूर्व बर्धमान जिल्ह्यातील औसग्राम विधानसभा मतदारसंघातून भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती. एका सामान्य घरकाम करणाऱ्या महिलेला तिकीट मिळाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मात्र, कल्पिता यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला आणि जनतेनेही त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना भरघोस मतांनी विजयी केले.

आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही कल्पिता माझी यांचा साधेपणा कायम आहे. “मी आजही एक सामान्य महिलाच आहे. गरिबांचे दुःख मला माहित आहे, कारण मी स्वतः त्यातून गेले आहे. आता आमदार म्हणून माझ्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवणे आणि विशेषतः महिलांच्या उत्थानासाठी काम करणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट असेल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
10:52
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16
Video thumbnail
लातुरात 'सीबीआय'चा तिसरा मोठा दणका! तीन तासांच्या चौकशीनंतर डॉ. मनोज शिरुरेंना पुण्यातून अटक
03:12
Video thumbnail
भटक्या कुत्र्यांच्या भीषण हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मांडला ठिय्या
02:39
Video thumbnail
लातूर उद्योग भवनमधील प्रा. शिवराज मोटेगावकरचे चार ते पाच प्लॉट्स वादाच्या भोवऱ्यात
03:58
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18

Latest news