Homeराष्ट्रीयहरिश राणा यांच्यावर अन्त्यसंस्कार

हरिश राणा यांच्यावर अन्त्यसंस्कार

अवयवदानामुळे ६ जणांना मिळणार नवे जीवन

गाझियाबाद : गाझियाबादचे रहिवासी हरीश राणा, ज्यांना इच्छामरणाची परवानगी देण्यात आली होती, त्यांच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांचे धाकटे भाऊ, आशिष राणा यांनी बुधवारी सकाळी ९:४० वाजता दिल्लीतील ग्रीन पार्क स्मशानभूमीत पार्थिवाला मुखाग्नी दिला. यापूर्वी हरीश यांचे पार्थिव स्मशानभूमीत आणण्यात आले होते. त्यांचे वडील, अशोक राणा (६२) यांनी मुलगा हरीश याला अखेरचा निरोप दिला.

कोणीही रडू नका. मुलगा शांततेत जाऊ द्या, यासाठी मी प्रार्थना करतो. तो पुढे जिथे जन्म घेईल, तिथे त्याला देवाचे आशीर्वाद मिळो. अवयवदानामुळे ६ जणांना नवे जीवन मिळणार असल्याचा आनंद असल्याचे ते म्हणाले.

३१ वर्षीय हरीश राणा यांनी काल, २४ मार्च रोजी दुपारी ४:१० वाजता दिल्लीतील एम्स येथे अखेरचा श्वास घेतला. ते १३ वर्षांपासून कोमात होते. सर्वोच्च न्यायालयाने ११ मार्च रोजी इच्छामरणाला परवानगी दिली होती. देशातील इच्छामरणाला परवानगी देण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.

कुटुंबाने हरीशच्या हृदयाचे झडप आणि बुबुळ दान केले. एम्समध्ये हरीशवर निष्क्रिय इच्छामरण प्रक्रिया करण्यात आली. याचा अर्थ असा की, गंभीर आजारी रुग्णाला जिवंत ठेवण्यासाठी दिला जाणारा बा जीवनरक्षक आधार किंवा उपचार थांबवले जातात किंवा काढून घेतले जातात, जेणेकरून रुग्णाचा नैसर्गिकरित्या मृत्यू होऊ शकेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR