21.7 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeराष्ट्रीयप्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर दिसणार ‘गणेशोत्सव’

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर दिसणार ‘गणेशोत्सव’

महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक माध्यमांसमोर

नवी दिल्ली : देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सोमवार, २६ जानेवारी रोजी साजरा होणार आहे. प्रजासत्ताक दिनी राजधानी नवी दिल्लीमधील कर्तव्य पथावर होणारे लष्कराचे संचलन, शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, थरारक कवायती आणि देशाभरातील विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्ररथ हे तर खास आकर्षण असते. दरम्यान, यावेळच्या प्रजासत्ताक दिनामध्ये दिल्लीतील कर्तव्यपथावर महाराष्ट्राचाही चित्ररथ दिसणार असून या चित्ररथामधून महाराष्ट्रातीलगणेशोत्सवाचा देखावा पाहता येणार आहे.

प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राच्या यावर्षीच्या चित्ररथासाठी आत्मनिर्भरतेचे प्रतीक-गणेशोत्सव ही संकल्पना मांडण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये शाडू मातीपासून घडवलेल्या गणेश मूर्तींच्या प्रतिकृती. कोकणात पारंपरिक पद्धतीने डोक्यावरून नेण्यात येणा-या गणेशमूर्ती, अष्टविनायकांच्या प्रतिकृती, गणेश मंदिरे आदी मांडण्यात आली आहेत. याबरोबरच या चित्रपटासोबत विविध कलाकार हे महाराष्ट्रामधील लोककला आणि परंपरांचंही दर्शन घडवणार आहेत.

दरम्यान, २६ जानेवारी २०२६ रोजी होणा-या प्रजासत्ताक दिनावेळी होणा-या पथसंचालनामध्ये देशातील १७ राज्ये आणि १३ मंत्रालयांचे मिळून ३० चित्ररथ सहभागी होणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR