23.9 C
Latur
Tuesday, September 10, 2024
Homeअंतरराष्ट्रीयडेहराडूनमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; पाच आरोपींना अटक

डेहराडूनमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; पाच आरोपींना अटक

डेहराडून : पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे प्रकरण देशभरात गाजत असतानाच आता उत्तराखंडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. डेहराडूनच्या आयएसबीटी रोडवेजच्या बसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिस त्यांची कसून चौकशी करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, पंजाबची रहिवासी असलेली मुलगी, मुरादाबादहून यूपी रोडवेजच्या बसमध्ये चढली होती आणि १३ ऑगस्टच्या रात्री सुमारे २ वाजता आयएसबीटी डेहराडूनला पोहोचली होती. रात्री उशिरा बस रिकामी झाल्यानंतर सुमारे ५ जणांनी तिच्यावर बलात्कार केला आणि मुलीला बसमधून उतरवून आरोपी तेथून निघून गेले. चाईल्ड हेल्पलाईन कल्याण समितीच्या पथकाला मुलगी आयएसबीटी बाहेर अत्यंत दयनीय अवस्थेत आढळली. समितीने मुलीचे समुपदेशन केल्यावर तिने समितीच्या सदस्यांना आयएसबीटीमध्ये घडलेली घटना सांगितल्यानंतर समितीच्या सदस्यांनी शनिवारी रात्री आयएसबीटी पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी या प्रकरणी ज्या आरोपींना पकडले आहे. त्यामध्ये धर्मेंद्र कुमार, रा. बंजारावाला ग्रँट बग्गावाला हरिद्वार (ड्रायव्हर), देवेंद्र, रा. चुडियाला भगवानपूर (कंडक्टर), रवी कुमार, रा. नवाबगंज जि. फारुखाबाद उत्तर प्रदेश (ड्रायव्हर), राजपाल रा. बंजारावाला ग्रँट बुग्गावाला हरिद्वार आणि राजेश कुमार (चालक) यांचा समावेश आहे. तर सोनकर, रा. माजरा पटेलनगर (कॅशियर) यांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR