मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नॅशनल क्रश म्हणून गिरीजा ओकला ओळखले जात आहे. गिरीजाचे साडीतील फोटो देशभरात व्हायरल झाले आणि तिला नॅशनल क्रश हा टॅग मिळाला. अशातच प्रिया बापटने नुकतेच सोशल मीडियावर गुलाबी साडीतील फोटो पोस्ट केले होते. या फोटोच्या खाली एका चाहत्याने गिरीजा ओकचा उल्लेख करत प्रियाच्या फोटोवर खोचक कमेंट केली. त्यावर प्रियाने दिलेला रिप्लाय चर्चेत आहे.
प्रियाने गुलाबी साडी परिधान केलेले फोटो पोस्ट केले होते. या फोटोखाली एका नेटक-याने कमेंट केली की तरी पन…. गिरीजा ओक गोडबोले १०० मतांनी आघाडीवर. यावर प्रियाने रिप्लाय केला की माझी पण फेव्हरेट आहे ती. कायम, अशाप्रकारे नेटक-याला प्रियाला रिप्लाय दिला. एकूणच गिरीजा ओक नॅशनल क्रश झाल्याचा आनंद प्रियाने व्यक्त केला. प्रिया आणि गिरीजा अनेक वर्षांपासून एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळेच नेटक-याने केलेल्या खोचक कमेंटला प्रियाने चांगले उत्तर दिले आहे.
नॅशनल क्रश टॅग मिळाल्यावर
गिरीजा काय म्हणाली?
गिरीजाला नॅशनल क्रशचा टॅग मिळाल्यावर तिचे काही अश्लील फोटोही व्हायरल झाले. यावर गिरीजा म्हणाली मला १२ वर्षांचा मुलगा आहे. आता तो सोशल मीडियाचा वापर करत नाही. पण मोठा झाल्यावर करेल. हे मॉर्फ केलेले फोटो आज उद्या आपल्याला दिसतील पण ते इंटरनेटवर सदैव राहतील. उद्या तो मोठा झाल्यावर त्याने माझा असा फोटो पाहिला तर त्याला काय वाटेल याचा विचार करुन मला वाईट वाटत आहे. त्याला माहित असेल की हा फोटो खरा नाही एआय आहे. आताही फोटो बघणा-यांना हे माहित आहे. पण तरीही तो फोटो बघताना एक चीप प्रकारची मजा येते. या सगळ्या गोष्टीचा विचार करुन मला हे सांगावसे वाटले.

