27.7 C
Latur
Friday, July 18, 2025
Homeराष्ट्रीयगुन्हेगारांना धार्मिक लेबले देणे धोकादायक : सिद्धरामय्या

गुन्हेगारांना धार्मिक लेबले देणे धोकादायक : सिद्धरामय्या

बंगळुरू : कर्नाटकातील हुबळी येथील एका कार्यकर्त्याला अटक करण्यात आल्याने राजकारण तापले आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) अटकेचा निषेध केला आहे. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, गुन्हेगारांना जातीय आणि धार्मिक लेबले देणे अत्यंत धोकादायक आहे, हे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी समजून घेणे आवश्यक आहे.

सिद्धरामय्या म्हणाले की, भाजपने चार वर्षे कुशासन आणि भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यात घालवली, पण अचानक आमच्या सरकारच्या कामगिरीवर सकारात्मक प्रतिक्रिया आल्याने ते घाबरले आहेत. बिनबुडाच्या आरोपांचे नेतृत्व करण्यासाठी हुबळी येथील एका गुन्हेगार संशयिताच्या अटकेवरून ते गोंधळ घालत आहेत. गुन्हेगारांना जातीय आणि धार्मिक लेबले देणे अत्यंत धोकादायक आहे, हे भाजप नेत्यांनी समजून घेणे आवश्यक आहे.

ते म्हणाले की, ‘काँग्रेसचे सरकार दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. निराशेने, भाजप नेते गुन्हेगारी संशयिताच्या अटकेचा निषेध करत आहेत. हे योग्य नाही. एखाद्या राष्ट्रीय पक्षाला गुन्हेगारी संशयिताचा बचाव करावा लागेल, अशी परिस्थिती येऊ नये. भाजपच्या कोणत्याही नेत्याला जराही बुद्धी असेल, तर त्याने कृपया हुबळीतील या माणसावरील आरोपांची यादी वाचून दाखवावी आणि मग त्याच्यासाठी लढायचे की नाही हे ठरवावे. लोकसंख्येमध्ये हिंदू बहुसंख्य असल्याने तुरुंगातही ते बहुसंख्य आहेत. हे सर्व हिंदू धर्माचे आहेत म्हणून भाजपने त्यांच्यासाठी लढेल का? असा सवालही त्यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR