25.3 C
Latur
Monday, November 4, 2024
Homeधाराशिवजगदाळवाडी येथे पावणे तीन लाखाचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास

जगदाळवाडी येथे पावणे तीन लाखाचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास

धाराशिव : प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील जगदाळवाडी येथे चोरट्यांनी एका महिलेचे घर फोडून सोन्याचे दागिने, दुचाकी व रोख रक्कम असा एकूण २ लाख ७५ हजार रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला. चोरीची ही घटना १३ डिसेंबरच्या रात्री घडली. या प्रकरणी वनिता बाळू भगत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्यांच्या विरोधात १४ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदाळवाडी ता. उमरगा येथील वनिता बाळु भगत यांच्या घरी दि. १३ डिसेंबरच्या रात्री चोरी झाली. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील संदुकामध्ये ठेवलेली रोख रक्कम ६५ हजार रूपये तसेच ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व दुचाकी असा एकूण २ लाख ७५ हजार रूपये किंमतीचा माल चोरुन नेला. या प्रकरणी वनिता भगत यांनी दि.१४ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पोलीस ठाणे येथे कलम ३७९ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR