Homeक्रीडागुजरातचे दिल्लीसमोर २११ धावांचे आव्हान

गुजरातचे दिल्लीसमोर २११ धावांचे आव्हान

तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने साधला द्विशतकी डाव गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी

नवी दिल्ली : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएलमधील १४ वा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्णधार शुभमन गिल, जोस बटलर आणि वॉशिंग्टन सुंदरच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ४ बाद २१० धावा करत दिल्ली कॅपिटल्सच्या संघासमोर विक्रमी २११ धावांचे टार्गेट सेट केले आहे. याआधी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने एवढ्या धावांचा यशस्वी पाठलाग केलेला नाही.

पहिल्यांदा फलंदाजी करताना साई सुदर्शनच्या रुपात गुजरात टायटन्सच्या संघाने १९ धावांवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर जोस बटलर आणि शुभमन गिल जोडी जमली. दोघांनी दुस-या विकेटसाठी ३२ चेंडूत ६० धावांची दमदार भागीदारी रचली. जोस बटलरने २७ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५२ धावांची दमदार खेळी साकारली. बटलर आपले काम करून गेल्यावर गिल-वॉशिंग्टन जोडी जमली. कर्णधार शुभमन गिलने ४५ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७० धावांची खेळी केल्यावर वॉशिंग्टन सुंदरने ३२ चेंडूत ५५ धावांचे योगदान दिले. या दोघांनी तिस-या विकेटसाठी ६० चेंडूत १०४ धावांची भागीदारी रचली. अखेरच्या षटकात ग्लेन फिलिप्सनं ९ चेंडूत केलेल्या १४ धावांच्या जोरावर गुजरातने दिल्लीच्या मैदानातील लढाई २०० पार धावसंख्येची केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR